RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

rbi.page.title.1
rbi.page.title.2

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78522541
अबँकीय वित्तीय कंपन्यांसाठीची लोकपाल योजना आरबीआयकडून, आता ठेवी न स्वीकारणा-या पात्र असलेल्या अबँकीय वित्तीय कंपन्यांनाही लागु

अबँकीय वित्तीय कंपन्यांसाठीची लोकपाल योजना आरबीआयकडून, आता ठेवी न स्वीकारणा-या पात्र असलेल्या अबँकीय वित्तीय कंपन्यांनाही लागु

एप्रिल 26, 2019

अबँकीय वित्तीय कंपन्यांसाठीची लोकपाल योजना आरबीआयकडून, आता ठेवी न स्वीकारणा-या पात्र असलेल्या अबँकीय वित्तीय कंपन्यांनाही लागु

एप्रिल 4, 2019 रोजीच्या, नाणेविषयक धोरणाच्या विकासात्मक व विनियामक धोरणांच्या निवेदनाच्या परिच्छेद 11 मध्ये घोषित केल्यानुसार, भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) ने आज, अबँकीय वित्तीय कंपन्या (एनबीएफसी) साठींची लोकपाल योजना 2018 (ही योजना) च्या व्याप्तीत, ग्राहक इंटरफेससह, रु.100 कोटी व त्यापेक्षा अधिक अॅसेट आकार असलेल्या व पात्र असलेल्या, ठेवी न स्वीकारणा-या अबँकीय वित्तीय कंपन्यांचाही (एनबीएफसी-एनडी) एप्रिल 26, 2019 रोजीच्या अधिसूचनेच्या अन्वये समाविष्ट केले आहे.

ह्या योजनेच्या व्याप्तीमधून, अबँकीय वित्तीय कंपनी - पायाभूत सोयी वित्तीय कंपनी (एनबीएफसी - आयएफसी), कोअर इनवेस्टमेंट कंपनी (सीआयसी), पायाभूत सोयी कर्ज-निधी - अबँकीय वित्तीय कंपनी (आयडीएफ - एनबीएफसी) आणि समापन होणारी एखादी अबँकीय वित्तीय कंपनी ह्यांना वगळण्यात आले आहे.

आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 45 आय ए खाली पंजीकृत झालेल्या एनबीएफसींविरुध्दच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी ही योजना, फेब्रुवारी 23, 2018 रोजी सुरु करण्यात आली होती, आणि सुरुवातीला त्यात ठेवी स्वीकारणा-या सर्व एनबीएफसींचा समावेश होता. ह्या योजनेखाली असलेल्या एनबीएफसींनी दिलेल्या सेवांमधील त्रुटींसंबंधीच्या तक्रारींचे विनाखर्च व जलद निराकरण करण्याची यंत्रणा ही योजना उपलब्ध करुन देते. एनबीएफसी लोकपालांची कार्यालये चार महानगरांमध्ये, म्हणजे, चेन्नई, कोलकात्ता, मुंबई व नवी दिल्ली येथे कार्यरत आहेत. व संबंधित क्षेत्रांमधील ग्राहकांच्या तक्रारी हाताळत आहेत.

ह्या योजनेनुसार, लोकपालाने दिलेल्या निर्णयावर, तक्रारदाराला/एनबीएफसीला अपीलीय प्राधिकरणाकडे अपील करण्यासाठी एक अपीलीय यंत्रणाही उपलब्ध आहे.

ही संपूर्ण योजना आरबीआयच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

योगेश दयाल
मुख्य महाव्यवस्थापक

वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/2542

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?