RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

rbi.page.title.1
rbi.page.title.2

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78509317
सार्वभौम सुवर्ण रोखे 2017 मालिका - दहा - प्रचालनाचे मूल्य

सार्वभौम सुवर्ण रोखे 2017 मालिका - दहा - प्रचालनाचे मूल्य

नोव्हेंबर 24, 2017

सार्वभौम सुवर्ण रोखे 2017 मालिका - दहा - प्रचालनाचे मूल्य

भारत सरकारची अधिसूचना एफ.क्र.4(25)–बी/(डब्ल्यु अँड एम)/2017 व आरबीआय परिपत्रक आयडीएमडी.सीडीडी.क्र.929/14.04.050/2017-18 दि. ऑक्टोबर 6, 2017 अन्वये, सार्वभौम सुवर्ण रोखे योजना, ऑक्टोबर 9, 2017 पासून डिसेंबर 27, 2017 पर्यंत, प्रत्येक आठवड्यातील सोमवार ते बुधवार, वर्गणीसाठी खुली असेल. दिलेल्या एखाद्या आठवड्यात मिळालेल्या अर्जांसाठी, पुढील आठवड्याच्या पहिल्या कामकाजाच्या दिवशी समायोजन केले जाईल.

नोव्हेंबर 27, 2017 ते नोव्हेंबर 29, 2017 ह्या वर्गणी कालासाठी ज्याचे समायोजन डिसेंबर 4, 2017 रोजी, ह्या रोख्यांची सरासरी बंद किंमत (वर्गणी कालाच्या म्हणजे नोव्हेंबर 22, 2017 ते नोव्हेंबर 24, 2017) आधीच्या आठवड्यातील शेवटच्या तीन कामकाजाच्या दिवसातील, 999 शुध्दतेच्या सोन्यासाठी, इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसीएशन लि. ((आयबीजेए) ह्यांनी प्रसिध्द केलेल्या साध्या सरासरी बंद किंमतीवर आधारित), प्रति ग्राम रु.2,961/- (रुपये दोन हजार नऊशे एकसष्ट) एवढी येते.

ऑनलाईन अर्ज करुन त्या अर्जासाठीचे प्रदान डिजिटल पध्दतीने करणा-या निवेशकांना, भारत सरकारने, भारतीय रिझर्व बँकेशी सल्लामसलत करुन प्रति ग्राम रु.50 सवलत देण्याचे ठरविले आहे. अशा निवेशकांनी, सुवर्ण रोखे देण्याचे मूल्य, प्रति ग्राम रु.2,911/- (रुपये दोन हजार नऊशे अकरा) असेल.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/1443

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?