RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

rbi.page.title.1
rbi.page.title.2

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78499501
लोकसेवा सहकारी बँक लि, पुणे, महाराष्ट्र ह्यांना दिलेल्या निदेशांना आरबीआयकडून मुदतवाढ

लोकसेवा सहकारी बँक लि, पुणे, महाराष्ट्र ह्यांना दिलेल्या निदेशांना आरबीआयकडून मुदतवाढ

नोव्हेंबर 20, 2016

लोकसेवा सहकारी बँक लि, पुणे, महाराष्ट्र ह्यांना दिलेल्या निदेशांना आरबीआयकडून मुदतवाढ

भारतीय रिझर्व बँकेने अधिसूचित केले आहे की, लोकसेवा सहकारी बँक लि. पुणे ह्यांना, मे 20, 2014 रोजीच्या व्यवहार बंद झाल्यापासून, दि. 19 मे 2014 च्या निदेशान्वये सहा महिन्यांच्या कालावधीसाठी निदेशांखाली ठेवण्यात आले होते. ह्या निदेशांची वैधता, आदेश दि. 12 नोव्हेंबर 2014, 6 मे 2015, 4 नोव्हेंबर 2015 आणि 13 मे 2016 रोजीच्या आदेशान्वये, प्रत्येक सहा महिन्यांसाठी, चार वेळा वाढविण्यात आली होती. जनतेच्या माहितीसाठी येथे अधिसूचित करण्यात येते की, दि. 12 नोव्हेंबर 2014, मे 6 2015, नोव्हेंबर 4, 2015 आणि मे 13, 2016 रोजी दिलेल्या निदेशांसह वाचित, मे 19, 2014 रोजी दिलेल्या निदेशाचा कार्यकाल, आणखी सहा महिन्यांसाठी, म्हणजे नोव्हेंबर 20, 2016 पासून ते मे 19, 2017 पर्यंत, पुनरावलोकनाच्या अटीवर, नोव्हेंबर 11, 2016 च्या सुधारित आदेशान्वये वाढविण्यात आला आहे.

संदर्भित निदेशातील इतर अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल नाही. नोव्हेंबर 11, 2016 च्या निदेशाची एक प्रत जनतेच्या माहितीसाठी वरील बँकेच्या कार्यालयात लावण्यात आली आहे.

भारतीय रिझर्व बँकेने केलेला बदल/सुधारणा ह्याचा अर्थ, वरील बँकेच्या आर्थिक स्थितीमध्ये लक्षणीय सुधारणा झाली असल्याबाबत रिझर्व बँकेचे समाधान झाले आहे असा घेण्यात येऊ नये.

अनिरुध्द डी जाधव
सहाय्यक व्यवस्थापक

वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1256

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?