आय कराची थकबाकी आधीच, आरबीआय किंवा प्राधिकृत बँक शाखांमध्ये जमा करा - मार्च 2017
फेब्रुवारी 16, 2017 आय कराची थकबाकी आधीच, आरबीआय किंवा प्राधिकृत बँक शाखांमध्ये जमा करा - मार्च 2017 भारतीय रिझर्व बँकेने आय कर निधीरितींना विनंती केली आहे की, त्यांनी त्यांच्या आय कराची थकबाकी ठरविण्यात आलेल्या तारखेच्या पुरेशा आधीच जमा करावी. असेही सांगण्यात आले की, करनिधीरिती त्यासाठी, एजन्सी बँकांच्या निवडक शाखा किंवा त्या बँकांनी देऊ केलेली, ऑनलाईन कर प्रदानाची सुविधा ह्यासारख्या पर्यायी वाहिन्यांचाही उपयोग करु शकतात. ह्यामुळे, रिझर्व बँकेच्या कार्यालयामध्ये लांबलचक रांगांमध्ये उभे राहण्याची असुविधा टाळता येईल. असे दिसून आले आहे की, भारतीय रिझर्व बँकेच्या मार्फत आय कर थकबाकी भरण्यासाठी दर वर्षी, मार्च अखेरीस खूप गर्दी होते आणि त्यामुळे, त्यासाठी जास्तीत जास्त अतिरिक्त कांऊटर्स उघडण्यात आले तरीही, पोचपावत्या देण्याचा भार सांभाळणे रिझर्व बँकेला कठीण होते. आय कर थकबाकी देण्यासाठी पुढील एकोणतीस एजन्सी बँकांनी प्राधिकृत करण्यात आले आहे यादी :
अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/2208 |
पेज अंतिम अपडेट तारीख: