अरुणाचल प्रदेश राज्यात नवीन जिल्ह्यांची निर्मिती - लीड बँकेची जबाबदारी सोपविणे
आरबीआय/2016-17/310 मे 25, 2017 अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महोदय/ महोदया, अरुणाचल प्रदेश राज्यात नवीन जिल्ह्यांची निर्मिती - लीड बँकेची जबाबदारी सोपविणे अरुणाचल प्रदेश राज्य सरकारने, राजपत्रित अधिसूचना दि. मार्च 3, 2014 अन्वये, अरुणाचल राज्यात चार नवीन जिल्ह्यांची निर्मिती अधिसूचित केली आहे. ह्या नवीन जिल्ह्यांची लीड बँक म्हणून जबाबदारी भारतीय स्टेट बँकेवर पुढीलप्रमाणे सोपविण्यात आली आहे.
(2) ह्याशिवाय, वरील राजपत्रित अधिसूचनेमध्ये ‘लोअर सियांग’ हा नवा जिल्हा प्रसिध्द करण्यात आला असला तरीही, ह्या जिल्ह्याची सीमा व प्रशासकीय एकके अद्याप निश्चित करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे अरुणाचल प्रदेश सरकारकडून मिळालेल्या संदेशानुसार हा जिल्हा अ-कार्यकारी आहे. त्यामुळे ह्या जिल्ह्याबाबतची लीड बँक जबाबदारी वेगळ्याने सोपविली जाईल. (3) ह्या नवीन जिल्ह्यांचे डिस्ट्रिक्ट वर्किंग कोड, बँकांद्वारे बीएसआर अहवाल पाठविण्यासाठी देण्यात आले आहेत. (4) अरुणाचल प्रदेश राज्यामधील इतर जिल्ह्यांबाबतच्या लीड बँक जबाबदा-यांमध्ये कोणताही बदल नाही. आपला विश्वासु,(अजय कुमार मिस्रा) |
पेज अंतिम अपडेट तारीख: