बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित कलम 35 अ खालील निर्देश - दि म्हापसा अर्बन को- ऑपरेटिव बँक ऑफ गोवा लि., गोवा - निर्देशांच्या कालावधीत वाढ
ऑगस्ट 16, 2019 बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित कलम 35 अ खालील निर्देश - दि म्हापसा अर्बन को- बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित कलम 35 अ खाली, भारतीय रिझर्व्ह बँकेने, दि म्हापसा अर्बन को-ऑपरेटिव बँक ऑफ गोवा लि., गोवा ह्यांना वेळोवेळी सुधारित केलेल्या, निर्देश दि. जुलै 24, 2015 अन्वये निर्देश दिले होते. त्यातील शेवटचा निर्देश फेब्रुवारी 15, 2019 रोजीचा असून त्यानुसार हे निर्देश दि. ऑगस्ट 18, 2019 पर्यंत वाढविण्यात आले होते. भारतीय रिझर्व्ह बँकेचे समाधान झाले आहे की, जनतेच्या हिताच्या दृष्टीने, दि म्हापसा अर्बन को-ऑपरेटिव बँक ऑफ गोवा लि., गोवा ह्यांना वेळोवेळी सुधारित केलेल्या जुलै 24, 2015 रोजीच्या निर्देशाचा कार्यकाल आणखी तीन महिन्यांनी वाढविणे आवश्यक आहे. त्यानुसार, बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 च्या कलम 56 सह वाचित कलम 35 अ च्या पोटकलम (1) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व्ह बँक येथे निर्देश देते की, वेळोवेळी सुधारित केलेले व शेवटून दि. ऑगस्ट 18, 2019 पर्यंत वैधता वाढविण्यात आलेले, दि म्हापसा अर्बन को-ऑपरेटिव बँक ऑफ गोवा लि., गोवा ह्यांना जुलै 24, 2015 रोजी देण्यात आलेले निर्देश, आणखी तीन महिन्यांसाठी, म्हणजे ऑगस्ट 19, 2019 ते नोव्हेंबर 18, 2019 पर्यंत, पुनरावलोकनाच्या अटीवर, त्या बँकेला लागु असणे सुरुच राहील. संदर्भित निर्देशामधील इतर अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल नाही. योगेश दयाल प्रेस प्रकाशन : 2019-2020/445 |
पेज अंतिम अपडेट तारीख: