RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

rbi.page.title.1
rbi.page.title.2

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78530821
बँकिंग विनियमन अधिनियम, 1949, कलम 56 चे वाचन करीता कलम 35 ए अंतर्गत निर्देश - यूथ डेव्हलपमेंट को-ऑपरेटिव्ह बॅंक लिमिटेड, कोल्हापुर, महाराष्ट्र

बँकिंग विनियमन अधिनियम, 1949, कलम 56 चे वाचन करीता कलम 35 ए अंतर्गत निर्देश - यूथ डेव्हलपमेंट को-ऑपरेटिव्ह बॅंक लिमिटेड, कोल्हापुर, महाराष्ट्र

01 जुलै 2020

बँकिंग विनियमन अधिनियम, 1949, कलम 56 चे वाचन करीता कलम 35 ए अंतर्गत निर्देश -
यूथ डेव्हलपमेंट को-ऑपरेटिव्ह बॅंक लिमिटेड, कोल्हापुर, महाराष्ट्र

भारतीय रिझर्व्ह बँकेने दिनांक 04 जानेवारी 2019 रोजी दिलेल्या निर्देश सं. DCBS.CO.BSD-I/D-06/12.22.311/2018-19 च्या अनुषंगाने यूथ डेव्हलपमेंट को-ऑपरेटिव्ह बॅंक लिमिटेड, कोल्हापुर, महाराष्ट्र वर दिनांक 05 जानेवारी 2019 ची कार्यालयीन वेळ संपल्यापासून दिशानिर्देश लादण्यात आले होते. निर्देशांची वैधता वेळोवेळी वाढवण्यात आलेली आहे आणि ह्या निर्देशांचा वैधता कालावधी, गेल्या वेळेस दिनांक 01 जानेवारी 2020 च्या सुधारित निर्देश सं DOR.CO.AID/D-46/12.22.311/2019-20 अनुसार 05 जुलै 2020 पर्यंत वाढविण्यात आली होती.

2. जनतेच्या माहितीसाठी सुचना देण्यात येत आहे की, भारतीय रिझर्व्ह बँक, बँकिंग विनियमन अधिनियम, 1949 कलम 56 चे वाचन करीता, कलम 35 ए, उप कलम (1) अनुसार, आपल्या प्रदत्त अधिकाराचा वापर करून असा आदेश देत आहे की उपरोक्त दिनांक 04 जानेवारी 2019 रोजी दिलेल्या निर्देश सं. DCBS.CO.BSD-I/D-06/12.22.311/2018-19 व नंतर वेळोवेळी दिलेल्या सुधारित निर्देशा अनुसार निर्देशाचा वैधता कालावधी जो दिनांक 05 जुलै 2020 पर्यंत वाढवला होता, तो दिनांक 29 जून 2020, च्या सुधारित निर्देश सं DOR.CO.AID/D-93/12.22.311/2019-20 द्वारा दिनांक 06 जुलै 2020 ते दिनांक 05 जानेवारी 2021 पर्यंत सहा महिन्यांसाठी वाढवला आहे, जो बँकेच्या आर्थिक आढाव्यावर पुनरावलोकनाधीन असेल. संदर्भाधीन निदेशातील इतर कोणत्याही नियम आणि अटी, बदललेल्या नाहीत.

3. दिनांक 29 जून 2020 च्या सुधारित निर्देशाची प्रत बँकेच्या जागेत जनतेच्या माहितीसाठी लावण्यात आलेली आहे.

4. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या उपरोक्त मुदत वाढीमुळे आणि/किंवा निर्देशातील परिवर्तनामुळे जनतेने असे गृहीत धरू नये की, बँकेच्या आर्थिक स्थितीवर भारतीय रिझर्व्ह बँक समाधानी आहे.

(योगेश दयाल) 
मुख्य महाप्रबंधक

प्रेस प्रकाशनी: 2020-2021/4

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?