रु.500/- व रु.1000/- च्या विद्यमान विहित बँक नोटांचे (एसबीएन) वैध चलन लक्षण काढून टाकणे - विवाह समारंभासाठी रोख रक्कम काढणे - सुधारणा/बदल
आरबीआय/2016-17/149 नोव्हेंबर 22, 2016 अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी, महोदय, रु.500/- व रु.1000/- च्या विद्यमान विहित बँक नोटांचे (एसबीएन) वैध चलन लक्षण काढून टाकणे - विवाह समारंभासाठी रोख रक्कम काढणे - सुधारणा/बदल कृपया आमचे परिपत्रक डीसीएम(पीएलजी)क्र.1320/10.27.00/2016-दि. नोव्हेंबर 21, 2016 चा संदर्भ घ्यावा. वरील परिपत्रकातील परिच्छेद 2.6 (क) मधील सूचनांमध्ये पुढीलप्रमाणे बदल/सुधारणा करण्याचे ठरविण्यात आले आहे. जेथे अशी रोख रक्कम रु.10,000/- किंवा अधिक असेल तेथे, काढलेली रोकड ज्यांना द्यावयाची आहे अशा व्यक्तींची सविस्तर यादी, आणि अशा व्यक्तींनी दिलेले त्यांचे बँक खाते नसल्याबाबतचे घोषणापत्र. प्रस्तावित प्रदान कोणत्या हेतुसाठी करण्यात येत आहे हे देखील त्या यादीमध्ये निर्देशित केले असावे आपली विश्वासु (पी विजया कुमार) |
पेज अंतिम अपडेट तारीख: