एटीएम्ससाठी सुरक्षा उपाय
आरबीआय/2018-19/214 जून 14, 2019 अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक/ महोदय/महोदया, एटीएम्ससाठी सुरक्षा उपाय ऑक्टोबर 4, 2016 रोजीच्या नाणेविषयक धोरण निवेदनाच्या परिच्छेद 15 मध्ये सांगण्यात आल्यानुसार, ह्या बँकेने, खजिन्याची ने-आण करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी, चलनाच्या ने-आणीवरील एक समिती स्थापन केली होती (अध्यक्ष : श्री डी के मोहंती, कार्यकारी संचालक). ह्या समितीच्या शिफारशींचे परीक्षण करण्यात आले असून त्यानुसार, एटीएमच्या कारभारातील जोखमी कमी करण्यासाठी व सुरक्षा वाढविण्यासाठी असलेले काही उपाय पुढे दिले आहेत. (अ) सर्व एटीएममध्ये रोख रक्कम, केवळ डिजिटल वन टाईम काँबिनेशन (ओटीसी) कुलुपांद्वारे ऑपरेट केली जातील. (ब) विमानतळ इत्यादीसारख्या अतिसुरक्षित असलेल्या, व सुयोग्य सीसीटीव्ही योजना असलेल्या व राज्य/केंद्र सरकारचे सुरक्षा रक्षक असलेल्या जागा सोडल्यास, सप्टेंबर 30, 2019 पर्यंत, सर्व एटीएम, एखाद्या पक्क्या बांधकामाशी (भिंत, खांब, जमीन इत्यादि) पक्के जोडले (ग्राउटेड) जातील. (क) वेळेवारी सावधानतेचा इशारा देण्यासाठी व जलद प्रतिसादासाठी, एखादी सर्वसमावेशक ई-सर्व्हिलन्स यंत्रणा एटीएममध्ये ठेवण्याचा विचार बँका करु शकतात. (2) भारतीय रिझर्व बँक व कायद्यांची अंमलबजावणी करणा-या एजन्सीजने दिलेल्या विद्यमान सूचना, कार्यरीती व मार्गदर्शन ह्यांच्या व्यतिरिक्त वरील उपायांची अंमलबजावणी केली जाईल. कालमर्यादांचे उल्लंघन/अनुपालन न करणे, केले गेल्यास दंडासह विनियामक कारवाई केली जाईल. आपला, (अजय मिचयारी) |
पेज अंतिम अपडेट तारीख: