RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

rbi.page.title.1
rbi.page.title.2
High Contrast Version
High Contrast Version
Text Size
Text Size
PwC_SIT

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78515074
करन्सी चेस्ट साठींची किमान मानके

करन्सी चेस्ट साठींची किमान मानके

आरबीआय/2018-19/166
डीसीएम (सीसी) क्र.2482/03.39.01/2018-19

एप्रिल 08, 2019

अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक/
मुख्य कार्यकारी संचालक
सर्व बँका

महोदय/महोदया,

करन्सी चेस्ट साठींची किमान मानके

ऑक्टोबर 4, 2016 रोजीच्या चलन विषयक धोरणाच्या परिच्छेद 15 मध्ये दिल्यानुसार, ह्या बँकेने, चलन हालचालींवरील एक समिती (सीसीएम) [अध्यक्ष : श्री. डी.के. मोहंती, कार्यकारी संचालक] स्थापन केली होती. ह्या समितीने इतर बाबींसह शिफारस केली होती की, रिझर्व्ह बँकेने, आधुनिक सुविधा असलेले, व किमान रु.10 बिलियन चेस्ट बॅलन्स लिमिट (सीबीएल) असलेले मोठे करन्सी चेस्ट (सीसीज) उघडण्यात बँकांना प्रोत्साहन द्यावे. त्यानुसार, नवीन करन्सी चेस्ट स्थापन करण्यासाठी पुढील किमान मानके ठेवली जावीत असे ठरविण्यात आले.

(1) स्ट्राँग रुम/व्हॉल्टचे क्षेत्रफळ किमान 1,500 चौ.फूट असावे. डोंगराळ/पोहोचण्यासाठी कठिण ठिकाणी (केंद्र/राज्य सरकार/सुयोग्य प्राधिकरणाकडून केलेल्या व्याख्येनुसार) असलेल्या स्ट्राँग रुम/व्हॉल्टचे क्षेत्रफळ किमान 600 चौ.फूट असावे.

(2) बँक नोटांची प्रक्रिया क्षमता, प्रतिदिन 660,000 नग असावी आणि डोंगराळ/पोहोचण्यास कठिण ठिकाणी असलेल्या करन्सी चेस्ट साठी ती क्षमता प्रतिदिन 2,10,000 नग इत्यादि.

(3) स्वयंचलनाला मान्यता व आयटी सोल्युशन्स स्थापन करण्यास स्वीकार करण्याची वृत्ती असावी.

(4) भारतीय रिझर्व्ह बँक च्या मतानुसार व प्रत्यक्ष परिस्थितीनुसार आणि वाजवी निर्बंधांसह रु.10 बिलियन सीबीएल असावी.

(5) बांधकाम/रचना इत्यादि संबंधाने, डीसीएम (सीसी) क्र.जी-18/03.39.01/2008-09 दि. नोव्हेंबर 14, 2008 अन्वये दिलेल्या इतर तांत्रिक गुणविशेषांचे पालन केलेले असावे.

2. सीसीज स्थापन करण्यास इच्छुक बँकांनी वरील किमान मानके ठेवण्याची खात्री करुन घ्यावी.

3. सीसीज उघडण्याबाबतच्या इतर सर्व सूचनांमध्ये कोणताही बदल नाही.

आपला विश्वासु,

(संजय कुमार)
महाव्यवस्थापक

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?