RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

rbi.page.title.1
rbi.page.title.2
High Contrast Version
High Contrast Version
Text Size
Text Size
PwC_SIT

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78523955
जनतेला ग्राहकसेवा देण्यातील कामगिरीवर आधारित चलन वाटप व विनिमय योजना (सीडीईएस) वरील महानिर्देश (जानेवारी 6, 2020 रोजी अद्यावत केल्यानुसार)

जनतेला ग्राहकसेवा देण्यातील कामगिरीवर आधारित चलन वाटप व विनिमय योजना (सीडीईएस) वरील महानिर्देश (जानेवारी 6, 2020 रोजी अद्यावत केल्यानुसार)

आरबीआय/2019-20/69
महानिर्देश डीसीएम(सीसी) क्र.जी-6/03.41.01/2019-20

जुलै 1, 2019
(जानेवारी 6, 2020 रोजी अद्यावत केल्यानुसार)

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक/
मुख्य कार्यकारी अधिकारी
सर्व बँका

जनतेला ग्राहकसेवा देण्यातील कामगिरीवर आधारित चलन वाटप व विनिमय योजना (सीडीईएस) वरील महानिर्देश

प्रस्तावनेत दिल्यानुसार व भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45 खाली आणि बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 35 अ खालील आमच्या स्चच्छ नोटा धोरणांच्या उद्दिष्टांना साध्य करण्यासाठी ही बँक, मार्गदर्शक तत्वे/सूचना देत असते. ही उद्दिष्टे टिकविण्यासाठी, सर्व बँका जनतेला अधिक चांगली ग्राहकसेवा देतील ह्याची खात्री करण्यासाठी चलन वाटप व विनिमय योजना (सीडीईएस) नावाची प्रोत्साहन योजना ह्या बँकेने तयार केली आहे.

(2) ह्या महानिर्देशात ह्या विषयावरील अद्यावत केलेली मार्गदर्शक तत्वे/परिपत्रके समाविष्ट करण्यात आली आहेत. हे महानिर्देश नवीन सूचना मिळाल्यानंतर वेळोवेळी अद्यावत केले जातील.

(3) हे महानिर्देश आरबीआयच्या www.rbi.org.in वेबसाईटवरही टाकण्यात आले आहेत.

आपला विश्वासु,

(मानस रंजन मोहंती)
मुख्य महाव्यवस्थापक

सोबत - वरील प्रमाणे


जोडपत्र

जनतेला ग्राहकसेवा देण्यातील कामगिरीवर आधारित, धनकोषांसह बँक शाखांसाठी ‘चलन वाटप व विनिमय योजना’ (सीडीईएस) वरील परिपत्रक

(1) धनकोषांसह बँक शाखांसाठीची ही चलन प्रसारण व विनिमय योजना (सीडीईएस), स्वच्छ नोट धोरणाच्या उद्दिष्टांना अनुसरुन, नोटा व नाणी बदलून देण्याच्या बाबतीत, सर्व बँक शाखा, जनतेला अधिक चांगली ग्राहकसेवा देतील ह्याची खात्री करुन घेण्यासाठी तयार करण्यात आली आहे.

(2) प्रोत्साहने

ह्या योजनेनुसार, नोटा व नाणी बदलून देण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी बँका पुढील वित्तीय प्रोत्साहनांसाठी पात्र असतील.

अनुक्रमांक सेवेचे स्वरुप प्रोत्साहनांचा तपशील
(1) बँकांची संख्या कमी असलेल्या राज्यातील 1 लाख पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या केंद्रात धनकोष उघडणे व ठेवणे. (अ) भांडवली खर्च : प्रति धनकोष रु.50 लाखाच्या मर्यादेपर्यंतच्या भांडवली खर्चाच्या 50% भरपाई ईशान्येकडील प्रदेशात, रु.50 लाखांच्या मर्यादेपर्यंत भांडवली खर्चाच्या 100% रक्कम भरपाईसाठी पात्र आहे.

(ब) महसूल खर्च : सुरुवातीच्या 3 वर्षांसाठी महसुली खर्चाच्या 50% भरपाई ईशान्येकडील प्रदेशात, सुरुवातीच्या 5 वर्षांसाठी महसुली खर्चाच्या 50% भरपाई दिली जाईल.
(2) बँक शाखांमध्ये मळलेल्या नोटा काऊंटरवर बदलून देणे/फाटक्या नोटांचा निर्णय करणे. (अ) मळक्या नोटा बदलून देणे : रु.50 मूल्याच्या नोटांपर्यंत मळक्या नोटांच्या अदलाबदलीसाठी प्रति पॅकेट रु.2.

(ब) फाटलेल्या नोटांचा निर्णय : रु.2 प्रति नग.
(3) काऊंटरवर नाण्यांचे वाटप करणे. (1) काऊंटरवर नाण्यांचे वाटप करण्यासाठी प्रति थैली रु.25/-.

(2) बँकांच्या दाव्यांची वाट न पाहताही ही प्रोत्साहने, धनकोषामधून केलेल्या निकासींच्या आधारावर दिली जातील.

(3) फुटकळ ग्राहकांना छोट्या प्रमाणात नाणी वाटली जात आहेत - मोठी गरज असलेल्या ग्राहकांना नव्हे - ह्याची खात्री करण्यासाठी तपासणी व शिल्लक तपासणीची एखादी प्रणाली बँकांनी ठेवावी.

(4) धनकोषाची तपासणी/शाखांना दिलेल्या गुप्त भेटी ह्यांच्याद्वारे, आरबीआयच्या प्रादेशिक कार्यालयाकडून नाणी वाटपाची पडताळणी केली जाईल.

(3) कामगिरी आधारित प्रोत्साहने मिळविण्यासाठी कार्यकारी मार्गदर्शक तत्वे

(1) आरबीआयच्या इश्यु ऑफिसमध्ये प्रत्यक्ष मिळालेल्या मळक्या नोटांवर प्रोत्साहने दिली जातील. ह्याबाबत बँकांनी वेगळ्याने दावा करण्याची आवश्यकता नाही. त्यांनी सादर केलेल्या मळक्या नोटा/वाटप केलेली नाणी ह्यासाठी धनकोष शाखेने ही प्रोत्साहने तिच्याशी जोडणी असलेल्या शाखांना त्या त्या प्रमाणात द्यावयाची आहेत.

(2) त्याचप्रमाणे, आरबीआयकडे केलेली मळक्या नोटांची प्रेषणे/रजिस्टर्ड/इन्शुअर्ड पोस्टाने सीलबंद लिफाफ्यातून पाठविलेल्या मळक्या नोटा ह्यांचेबरोबर मिळालेल्या निर्णय घेण्यात आलेल्या नोटांसाठीचे प्रोत्साहनही दिले जाईल.

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?