आरबीआयमध्ये किंवा प्राधिकृत बँक शाखांमध्ये आयकराची बाकी प्रदान करा
नोव्हेंबर 13, 2015 आरबीआयमध्ये किंवा प्राधिकृत बँक शाखांमध्ये आयकराची बाकी प्रदान करा. देय तारखेच्या ब-याच आधी, आयकराची रक्कम प्रेषण करण्यासाठी, भारतीय रिझर्व बँकेद्वारा आयकरदात्यांना सांगण्यात येत आहे. त्यात असेही सांगण्यात आले आहे की, आय कर दाते, एजन्सी बँकांच्या निवडक शाखा किंवा ह्या बँकांनी देऊ केलेली ऑनलाईन प्रदान सुविधा ह्यासारख्या पर्यायी रीतींचा वापर करु शकतात. ह्यामुळे, रिझर्व बँकेच्या कार्यालयांमध्ये लांबलचक रांगेत उभे राहण्याचा त्रास वाचेल. असे दिसून आले आहे की, दर वर्षी डिसेंबरच्या अखेरीस, रिझर्व बँकेच्या मार्फत कर प्रदान करण्यासाठी खूप मोठी गर्दी होते आणि त्यासाठी जास्तीत जास्त अतिरिक्त काऊंटर्स उघडूनही, त्याबाबतच्या पावत्या देणे रिझर्व बँकेसाठी अवघड होते. आय कराचे प्रदान स्वीकारण्यासाठी पुढील एकोणतीस एजन्सी बँकांना प्राधिकृत करण्यात आले आहे.
अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन: 2015-2016/1142 |
पेज अंतिम अपडेट तारीख: